जि. प. अध्यक्षपदाच्या आरक्षणाची मोठी चर्चा सुरु असतानाच आज दि. 12 सप्टेंबर रोजी दुपारी अध्यक्षपदाचे आरक्षण जाहीर करण्यात आले असून, यामध्ये वाशिम जिल्हा परिषदेचे अध्यक्षपद अनुसुचित जमाती महिलेसाठी राखीव करण्यात आले आहे. यामुळे आता राज्यात काही दिवसातच जिल्हा परिषद निवडणूकांचे बिगुल वाजणार असून, सर्वच राजकीय पक्षाच्या नेत्यांसह उमेदवारांनीही जोरदार मोर्चेबांधणीला सुरुवात केली आहे.