कुटुंबात कौटुंबिक वाद झाला. या वादातून संतापलेल्या एका 35 वर्षीय महिलेने विषारी औषध प्राशन केले. ही घटना कुटुंबीयांच्या लक्षात येताच कुटुंबीयांनी तिला उपचारासाठी कोंढा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केले मात्र प्रकृती अधिकच गंभीर असल्याने तीला पुढील उपचारासाठी भंडारा येथे हलविण्यात आले. कुटुंबीयांनी संबंधीताला भंडारा येथील एका खाजगी रुग्णालयात दाखल केले मात्र उपचारादरम्यान विष प्राशनकर्त्या महिलेचा मृत्यू झाल्याची घटना २४ सप्टेंबर रोजी सकाळी ५ वाजताच्या सुमारास उघडकीस आली.