ज्येष्ठ नागरिकांच्या पालन पोषणाचा कायदा केंद्र सरकारने नव्याने निर्माण करून त्याची अंमलबजावणी करण्यासंदर्भात आदेश जारी केले होते त्याच अनुषंगाने पोलिसांनी अशा प्रकरणाची दखल घेत आहे.वडिलांचा सांभाळ न करणे मुलांना भोवले आहे. वडिलांच्या तक्रारीवरून पोलिसांनी दोन्ही मुलाविरुद्ध गुन्हे दाखल केले. गुलशन नगर मध्ये वास्तव्याला असणारे जब्बार अली यांनी दिलेल्या फिर्यादीवरून फैजाज आणि सत्तार या दोघाविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले.