राहुरी फॅक्टरी परिसरात काही दिवसापासून चोऱ्यांचे प्रमाण वाढले असून आता तर चार चाकी गाड्यांचे टायर चोरणारी टोळीच या भागामध्ये सक्रिय झाली आहे.चार दिवसांपूर्वीच येथील एका चारचाकी वाहणाचे पुढची चाके अज्ञात चोरट्यांनी खोलून चोरून नेल्याची घटना ताजी असतानाच आज पहाटे पुन्हा राहुरी फॅक्टरी परिसरातील डॉ.तनपूरे कारखाना कॉलनीतील नजीर रज्जाक सय्यद यांच्या राहत्या घरासमोरून अज्ञात चोरट्यांनी घरासमोर उभ्या असलेल्या पीकअप वाहनाचे चाके खोलून चोरून नेल्याची घटना घडली आहे.