चोपाळे येथील संत दगा महाराज विद्यालय येथील आय सी टी लेब मधून 48 हजार रुपये किमतीचे कंप्यूटर चे साहित्य अज्ञात चोरट्याने चोरून नेले आहे. याबाबत दि. 4 सप्टेंबर रोजी दुपारी रामू शर्मा यांनी नंदुरबार तालुका पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे सदर पुढील तपास पोलीस हवालदार मनोज विसपुते करीत आहे.