जालना जिल्ह्यातील 8 सहाय्यक पोलीस निरीक्षकाच्या बदल्या करण्यात आल्या असून त्यात जिल्हा वाहतूक शाखा, मौजपुरी पोलीस ठाणे, टेंभुर्णी, तिर्थपुरी पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकार्यांचा समावेश आहे. या संदर्भातील पोलीस अधिक्षक यांचे आदेश जारी झाल्याची माहिती गुरुवार दि.31 जुलै 2025 रोजी रात्री 9 वाजेच्या सुमारा पोलीस सुत्राकडून मिळाली. जिल्हा पोलीस अधीक्षक अजय कुमार बंसल यांनी जालना जिल्ह्यातील तीन पोलीस ठाण्यासह जिल्हा वाहतूक शाखेच्या प्रभारी अधिकार्यांच्या बदल्या करून नविन नियुक्त्या दिल्या.