दिं.29 ऑगस्ट 2025 ला मुख्य कार्यकारी अधिकारी मंदार पत्की यांच्या मार्गदर्शनात शिक्षणाधिकारी प्रकाश मिश्रा यांच्या नियंत्रणात निकोप वातावरणात समुपदेशन प्रक्रिया राबविण्यात आली. जिल्हा परिषद शाळेचे मुख्याध्यापक, पदवीधर शिक्षक यांना बढती देण्यात आली आहे. त्यामुळे जिल्ह्यातील 79 शिक्षकांना केंद्रप्रमुख म्हणून पदोन्नती मिळाली आहे. यामध्ये सर्वसाधारण शिक्षकामधून 76 व दिव्यांगामधून 3 शिक्षकांचा समावेश आहे.