जळगाव रेल्वे स्टेशनला खानदेश कन्या कवयित्री बहिणाबाई चौधरी यांचे नाव द्यावे, तसेच मुंबईतील दादर स्टेशनला 'भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर चैत्यभूमी स्टेशन' असे नाव द्यावे, या प्रमुख मागण्यांसाठी रविवारी २४ ऑगस्ट रोजी दुपारी १२ वाजता पीपल्स रिपब्लिकन पार्टीच्या वतीने आंदोलन करण्यात आले. जिल्हाध्यक्ष राजीव मोरे यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोर करण्यात आले.