छत्रपती संभाजीनगर: शहरात सर्रास गांजा ड्रग्स नशेची औषध विक्री होत असल्याची तक्रार सातत्याने होत होती. यावरून संभाजीनगर पोलीस ॲक्शन मोडवर आले आहेत. अनेक भागांमध्ये छापे टाकून नशेची पदार्थ विक्री करणाऱ्यांना पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. सिडको भागात नशेची औषधी विक्री करणाऱ्यांना पोलिसांनी अटक केली असून जिथे त्यांची दहशत आहे तिथेच पोलिसांनी धिंड काढली आहे.