राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रमुख खा. शरदराव पवार यांच्या सूचनेनुसार फलटण विधानसभा मतदार संघात आपण सर्व क्षेत्रात काम करणाऱ्या नागरीकांच्या भेटी गाठी सध्या घेत आहे. फलटण विधानसभा मतदार संघात आपण पूर्ण ताकदीने आगामी विधानसभा निवडणुक लढविणार असल्याचे मुरुम ता. फलटण येथील सुपुत्र व पुणे येथील उद्योजक बुवासाहेब हुंबरे यांनी सांगितले. शुक्रवार दि. ६ सप्टेंबर रोजी सायंकाळी ७ वाजता फलटण येथे उद्योजक बुवासाहेब हुंबरे यांची पत्रकार परिषद झाली.