बीड शहरातील यशवंतराव चव्हाण नाट्यगृह येथे आज शनिवार, ६ सप्टेंबर रोजी सकाळी दहा वाजता रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले. हा उपक्रम दैनिक आरंभचे संपादक श्री. दीपक थोरात यांच्या पुढाकाराने राबविण्यात आला.या शिबिरात अनेक नागरिकांनी स्वेच्छेने रक्तदान केले. रक्तदान हे सर्वात मोठे दान आहे, असा संदेश या कार्यक्रमातून देण्यात आला. आयोजकांनी रक्तदात्यांचे मनःपूर्वक आभार मानले.