सांगोला विधानसभा मतदारसंघातील घेरडी पंचायत समिती गणात सांगोला विधानसभा शेतकरी कामगार पक्षाचे आमदार बाबासाहेब देशमुख यांनी गाव भेट दौऱ्यानिमित्त गणातील गावांना भेट दिली. यावेळी गोरगरीब, कष्टकरी,शेतकरी जनतेच्या अडचणी जाणून घेऊन शक्य त्या अडचणी जागेवरच सोडवण्याचा प्रयत्न केला. यावेळी प्रत्येक गावामध्ये नागरिक माता- भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.