145 वर्षाच्या ऐतिहासिक परंपरेचा अविभाज्य भाग असलेल्या आणि धार्मिक सामाजिक महत्त्व असलेल्या मारबत महोत्सव नागपूरकरांच्या अभूतपूर्व अशा उत्साह पूर्ण वातावरणात संपन्न होत आहे. नागरिकांमध्ये उत्साह ओसंडून वाहत आहे . इतवारी परिसरात नागपूर शहरात काढण्यात आलेल्या काळ्या व पिवळ्या मारबतीची गळा भेट झाली. हे दृश्य बघण्यासाठी नागपूरकर अक्षरशः वर्षभर वाट बघत असतात. हा एकमेव असा उत्सव आहे जो नागपुरात उत्साहात साजरा केला जातो.