शिरूर कासार पोलिसांनी अवैध गुटखा साठा प्रकरणातील सात महिन्यांपासून फरार असलेला आरोपी बंडू निवृत्ती जाधव, रा. हिवरसिंगा, याला अटक केली आहे. पोलिसांनी गुप्त माहितीच्या आधारे हिवरसिंगा परिसरात सोमवार दि 8 सप्टेंबर रोजी, सायंकाळी 5 वाजण्याच्या सुमारास, सापळा रचून ही कारवाई केली. सध्या आरोपीकडून पुढील तपास सुरू आहे.या कारवाईत सपोनि प्रवीण जाधव, पोलीस उपनिरीक्षक देविदास खांडखोळे, हवालदार अनिल तांदळे आणि शिपाई सतीश बहिरवाल यांनी सहभाग घेतला.