सर्वोच्च न्यायालयानेही सर्वच मराठा हे कुणबी आहेत असे सरसकट ग्राह्य धरता येत नाही, असे सांगितलेले आहे. म्हणूनच भारतीय जनता पक्षाने जीआरमार्फत जो निर्णय घेतला आहे, तो फसवणारा आहे, असा थेट आरोप प्रकाश आंबेडकर यांनी केला.तसेच, या शासन निर्णयाच्या माध्यमातून राधाकृष्ण विखे पाटील यांच्या समितीलाही फसवण्यात आले आहे.