वरवंडी गावचे सुपुत्र, सैन्य दलातील हवलदार तथा एसीपी नायब सुभेदार मेजर संजय केशव अडसुरे यांची २४ वर्ष देशसेवा पूर्ण करून सेवानिवृत्ती झाले. या गौरवपूर्ण क्षणानिमित्ताने व त्यांच्या या अतुलनीय योगदानाचा सन्मान करण्यासाठी गावामधे त्यांचा भव्य नागरिक सन्मान सोहळा आयोजित करण्यात आला होता. आज रविवारी सकाळी हनुमान मंदिराच्या सभागृहामध्ये हा सेवापूर्ती सोहळा संपन्न झाला.