मेहकर लोणार मतदार संघाचे आमदार सिद्धार्थ खरात यांनी आज दिनांक ९ सप्टेंबर २०२५ रोजी जिल्हा परिषद मराठी प्राथमिक शाळा मुंदेफळ येथे भेट देऊन शिक्षक, विद्यार्थी व पालकांशी संवाद साधला तसेच येथिल समस्या जाणून घेतल्या.तसेच विद्यार्थ्यांना काही प्रश्न विचारले त्यावर त्यांनी समाधान कारक उत्तर दिले. त्या मुळे उपस्थित शिक्षक मंडळीचे आमदार सिद्धार्थ खरात यांनी अभिनंदन केले.