अमळनेर तालुक्यात शुक्रवारी 29 ऑगस्ट रोजी सायंकाळी 5 वाजता मोठ्या प्रमाणावर पाऊस झाला. जोरदार पावसामुळे, विशेषतः मारवड आणि भरवस मंडळात, अतिवृष्टीसदृश परिस्थिती निर्माण झाली. या अतिवृष्टीमुळे शेतात पुराचे पाणी शिरले असून, सखल भागांत पाणी साचल्याने शेतीपिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. यामुळे पिके वाहून गेली असून, जमिनीची मातीही वाहून गेल्याचे चित्र आहे. या नुकसानीमुळे शेतकरी हवालदिल झाले असून, त्यांना शासनाकडून मदतीची अपेक्षा आहे.