आदिवासी विद्यार्थ्यांच्या विशेष पदभरतीच्या मागणीसाठी 16 ऑगस्ट 2025 पासून तहसीलदार कार्यालयासमोर सुरू झालेले साखळी उपोषण शासन व प्रशासनाच्या निष्क्रिय भूमिकेमुळे गंभीर वळणावर गेले. उपोषणकर्ते आतिश वाघमारे व प्रकाश मोरे यांनी 21 ऑगस्टपासून आमरण उपोषण सुरू करत संघर्ष अधिक तीव्र केला होता. या आंदोलनाला आदिवासी समाजातील विविध संघटना जसे की आदिवासी कर्मचारी संघटना, आदिवासी पॅंथर संघटना, आफ्रोट संघटना, बिरसा ब्रिगेड, बिरसा क्रांती दल, अ.भा.आ.वि.प. यांनी ठाम पाठिंबा दर्शवला.