दिनांक 3 ऑक्टोंबर ला राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (NCP) तिरोडाचे अध्यक्ष आणि गोंदिया जिल्हा परिषदेचे सदस्य श्री. जगदीश (बालू) बावनथडे यांनी बरबसपुरा येथील शारदा मातेचे दर्शन घेतले. यावेळी त्यांनी मातेची विधिवत पूजा करून समस्त नागरिकांसाठी मंगल कामना केली आणि महाप्रसादीचा लाभ घेतला. यावेळी त्यांनी आई शारदेला सर्वांच्या आयुष्यात सुख, समृद्धी आणि आरोग्य नांदो अशी प्रार्थना केली.