दि पुणे डिस्ट्रिक्ट पोलिस को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीच्या सचिवपदी जमीर तांबोळी यांची बिनविरोध निवड झाली आहे.निवडणूक प्रक्रिया सहकारी संस्थेच्या उपनिबंधक नीलम पिंगळे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. या निवडीत नवनिर्वाचित अध्यक्ष उदय काळभोर, उपाध्यक्षपदी सुमित कदम, तर खजिनदारपदी दिनेश गडांकुश यांची निवड झाली आहे.