दि.7 सप्टेंबर रोजी दु.3वाजेच्या सुमारास सुपर वुमन च्या वतीने राईस मिल असोसिएशन सभागृह ग्रेन मार्केट गोंदिया येथे आयोजित गुरु श्री अवार्ड 2025 ने गोरेगाव तालुक्यातील तिघांना सन्मानित करण्यात आले यात शिक्षिका लिनता लोखंडे, मुख्याध्यापक मोहन बिसेन, शिक्षिका सारिका चंदेल यांचा समावेश आहे. शैक्षणिक क्षेत्रात उत्कृष्ट कार्य केल्याबद्दल या तिघांचा मोमेंटम शाल श्रीफळ देऊन उपस्थित मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. प्राप्त देशाबद्दल सत्कारमूर्तींचे गोंदिया जिल्ह्यातअभिनंदन होत आहे.