जालना शहरातील मंगळबाजार परिसरात बेकायदेशीरपणे गोवंशीय जनावरांची कत्तल करून मांस विक्री केल्याच्या गोपनीय माहितीवरून पोलिसांनी छापा टाकून मोठ्या प्रमाणावर गोवंशीय मांस जप्त केले आहे. या कारवाईत एक आरोपी पोलिसांच्या ताब्यात असून दुसरा आरोपी फरार झाला आहे. अशी माहिती गुरुवार दि. 11 सप्टेंबर 2025 रोजी दुपारी 3 वाजता पोलीस सुत्रांनी दिली. सदर कारवाई 10 सप्टेंबर 2025 रोजी सकाळी करण्यात आली. पोलीस उपनिरीक्षक सचिन वासूदेवराव सानप (सदर बाजार पोलीस ठाणे, जालना) यांच्या पथकाने कारवाई केली.