मुकरीटोला गावातील युवकांना खेळासाठी प्रोत्साहन म्हणून सिनेट सदस्या तनुश्री धर्मरावबाबा आत्राम यांच्या तर्फे फुटबॉल साहित्याचे वाटप करण्यात आले. या उपक्रमामुळे गावातील युवकांना क्रीडा क्षेत्रात नवी उर्जा मिळणार असून, फुटबॉल खेळ अधिक जोमाने खेळला जाईल, असा विश्वास युवकांनी व्यक्त केला. गावातील ज्येष्ठ नागरिक व पालकांनी या उपक्रमाचे कौतुक केले.