फिर्यादी हिरदास संगणवार यांच्या तक्रारीनुसार 23 ऑगस्टला सायंकाळी सात वाजताच्या सुमारास फिर्यादी हा त्याच्या आई सोबत बोलत असताना काही कारण नसताना आरोपी विनोद खंदारे व आणखी एक अशा दोघांनी फिर्यादीस लाकडी काठीने मारून जखमी केले व जीवे मारण्याची धमकी दिली. या प्रकरणी 24 ऑगस्टला दुपारी अंदाजे साडेबारा वाजता च्या सुमारास पारवा पोलिसात दिलेल्या तक्रारीवरून आरोपी विरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले.