राज्य सरकारकडून आणण्यात आलेल्या सुरक्षा विधेयकाविरोधात शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने कारंजा येथे तहसील कार्यालयात उपविभागीय अधिकारी यांना निवेदन देण्यात आले. या विधेयकामुळे नागरिकांच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर, वैयक्तिक स्वातंत्र्यावर व शांततेत आंदोलन करण्याच्या लोकशाही हक्कांवर गदा येणार असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले. या कायद्याचा गैरवापर करून सामान्य नागरिक, कार्यकर्ते व पत्रकार यांना लक्ष्य करण्याची शक्यता असल्याचा इशाराही पदाधिकाऱ्यांनी दिला.