गोंदिया जिल्हा पोलीस दलाच्या वतीने राबविण्यात आलेल्या "डि.जे. मुक्त अभियानाला" आमगांव तालुक्यातील गणेश मंडळांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला आहे. पोलिसांनी केलेल्या आवाहनाला सकारात्मक प्रतिसाद देत पोलीस स्टेशन आमगांव हद्दीतील तब्बल १०२ गणेश मंडळांपैकी ६१ मंडळांनी डि.जे.चा वापर टाळून पारंपारीक वाद्यांना प्राधान्य दिले. या प्रशंसनीय कार्यासाठी आमगांव पोलीस स्टेशनतर्फे या मंडळांचा विशेष सत्कार करण्यात आला.