गणेशोत्सव २७ ऑगस्ट ते ६ सप्टेंबरदरम्यान उत्साहात आणि शांततेत साजरा व्हावा, यासाठी सोलापूर ग्रामीण जिल्ह्यात शांतता समितीची बैठक पार पडली. या वेळी पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांनी मार्गदर्शन करत “No DJ – No Dolby” ही योजना राबवण्याचे आवाहन केले. गणेश मंडळांनी CCTV बसवणे, वृक्षारोपण, रक्तदान शिबिर यांसारखे उपक्रम राबवावेत, असेही ते म्हणाले. डॉल्बीमुळे होणारे ध्वनीप्रदूषण व लहान-मोठ्यांवरील दुष्परिणाम टाळण्यासाठी यावर्षी सर्व मंडळांनी सहकार्य करण्याचे आश्वासन दिले.