शिरगाव येथे अपघातात जखमी झालेल्या पिरळ येथील तरुणाचा उपचारादरम्यान १२ मार्च रोजी सकाळी मृत्यू झाला. प्रवीण पाटील हाँ १६ फेब्रुवारी रोजी सायंकाळी कामावर जात असताना शिरगाव येथे त्याच्या दुचाकीसमोर कुत्रा आडवा आला. कुत्र्याला चुकविण्याच्या प्रयत्नात दुचाकी घसरून तो गंभीर जखमी झाला होता. उपचार सुरू असताना १२ मार्च रोजी त्याची प्राणज्योत मालवली.