जालना-अंबड महामार्गावर गोलापांगरी टोलनाक्याजवळ मंगळवार दि. 9 सप्टेंबर 2025 रोजी सायंकाळी 6 वाजेच्या सुमारास झालेल्या भीषण अपघातात एका मोटरसायकलस्वाराचा मृत्यू झाला आहे. अपघातानंतर पिकअप चालक घटनास्थळावरून पसार झाला असून पोलिसांकडून त्याचा शोध सुरू आहे. मिळालेल्या माहितीनुसार, सायंकाळी सहा वाजता मोटरसायकल (क्र. एम.एच.21 एझेड 6932 वरून जालन्याकडून अंबडकडे जात असलेले भगवान उद्धव काळे (वय 30, रा.घुंगरडे हादगाव,ता.अंबड,जि.जालना) यांची मोटरसायकल व पिकअप क्र.एम.एच.01 एपी 2040 चा अपघात झाला.