छत्रपती संभाजीनगर चौफुली येथे ट्रॅफिक युनिट असतानाही नागरिक सर्रास सिग्नल तोडत गाड्या चालवताना दिसून येत आहेत. शहरात अपघाताचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढलेले असूनही पोलिसांकडून याकडे दुर्लक्ष होत असल्याची चर्चा नागरिकांमध्ये आहे. सिग्नलपासून काही अंतरावर उभे राहून पोलीस फक्त नंबर प्लेट बघून गाड्या अडवत असल्याची नाराजी नागरिकांमध्ये व्यक्त होत आहे. नाशिक शहरात ट्रॅफिक पोलीस मोठ्या प्रमाणात दंड वसुली करत असले तरी त्याचा नागरिकांवर काहीही परिणाम झालेला नाही.