ऐतिहासिक रोहा शहरात नव्याने उभारण्यात आलेले डॉ.चिंतामणराव देशमुख नाट्यगृह तरुण पिढीला प्रेरणादायी असल्याचे प्रतिपादन आज शुक्रवारी संध्याकाळी ५ च्या सुमारास राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज येथे केले. रोहा येथील डॉ.चिंतामणराव देशमुख नाट्यगृहाचे उद्घाटन कार्यक्रम प्रसंगी ते बोलत होते. यावेळी खासदार सुनील तटकरे, महिला व बाल विकास मंत्री कु.आदिती तटकरे, जिल्हाधिकारी किशन जावळे, मुख्य कार्यकारी अधिकारी नेहा भोसले, जिल्हा पोलीस अधीक्षक आचल दलाल उपस्थित होते.