मिरज शहरातील मालगाव रोड, खोतनगर नुराणी गल्ली, रस्ता क्र. ३ येथे महापालिकेने पाणीटाकी बांधलेली आहे. मात्र या पाणीटाकीच्या परिसरात अजिबात स्वच्छता ठेवली जात नाही. पाणीटाकीजवळ ड्रेनेजचे घाणपाणी साचून राहिल्याने परिसरात दुर्गंधी पसरली असून नागरिकांच्या आरोग्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. वारंवार तक्रारी करूनही महापालिकेचे अधिकारी जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत असल्याचा आरोप स्थानिक नागरिकांनी सोमवारी दुपारी 3 वाजता केला आहे. या पार्श्वभूमीवर स्वाभिमानी गुंठेवारी संघर्ष समितीने जोरदार भूमिक