महाविकास आघाडी या वतीने डहाणू येथे जनसुरक्षा कायद्याच्या विरोधात आंदोलन करण्यात आले. आमदार विनोद निकोले यांच्या नेतृत्वात हे आंदोलन करण्यात आले यावेळी सरकार विरोधात भर रस्त्यात बसून सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी आणि निदर्शने करण्यात आली. मोठ्या संख्येने माकप,शिवसेना ठाकरे पक्ष,राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष,काँग्रेस,कष्टकरी संघटना,विविध पक्ष संघटनांचे पदाधिकारी कार्यकर्ते सहभागी झाले. जनसुरक्षा कायदा रद्द करा अशी मागणी या आंदोलनाच्या माध्यमातून करण्यात आली.