आज देशातील महिलांना आणि भावांना दिलासा मिळाला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली आणि केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्या प्रयत्नांतून जीएसटी सुलभ झाला आहे. हा निर्णय प्रत्येक भारतीय स्त्रीच्या खांद्यावरचं ओझं हलकं करण्याचं पाऊल आहे, अशी प्रतिक्रिया भाजप महिला प्रदेशाध्यक्ष तथा आमदार चित्रा वाघ यांनी शुक्रवारी दुपारी १२.३० वाजता व्यक्त केली.