शिरसोली येथे बौद्ध समाजाच्या स्मशानभूमीच्या जागेत ग्रामपंचायतीने सुरू केलेल्या कॉम्प्लेक्सच्या कामावरून मोठा वाद निर्माण झाला आहे. स्मशानभूमीच्या जागेचे पावित्र्य जपण्याची मागणी करत संतप्त समाज बांधवांनी शुक्रवारी, ५ सप्टेंबर रोजी सकाळी ११ वाजता बांधकामाच्या ठिकाणी येवून काम बंद करण्याची मागणी करत सरपंच आणि ग्रामसेवकांना निवेदन दिले. जर हे काम तातडीने थांबवले नाही, तर भविष्यात मोठे आंदोलन छेडण्याचा इशाराही यावेळी देण्यात आला.