जुन्या भांडणाच्या कारणावरून हातात कोयते घेऊन घरासमोर येऊन यावेळी घरात असलेल्या तीन महिलांना विचारले, गणेश कुठे आहे ? माझ्या मित्राला मारतो काय.. असे म्हणून गणेश याचे तुकडे करून ठार करणार असे म्हणत दहशत पसरवण्यात आली. या प्रकरणी माळवस्ती, होलेवाडी (राजगुरुनगर, ता. खेड) येथील एका ४९ वर्षीय महिलेने खेड पोलिसांत तक्रार दिली आहे.