मेहकर शहरातील मातोश्री निवासस्थान शिवाजी नगर येथे 6 सप्टेंबर रोजी दुपारी 1 वाजता केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांनी सहपरिवार श्री गणरायाचे दर्शन घेऊन आरती केली. व सर्वांच्या जीवनातील दुःख दूर होऊन सुख, शांती आणि समृद्धी नांदो अशी गणराया चरणी प्रार्थना केली. यावेळी सौ.राजश्रीताई जाधव,युवासेना सहसचिव तथा जिल्हाप्रमुख ऋषी जाधव,मयुरीताई ऋषी जाधव उपस्थित होते.