मराठा आरक्षण उपसमितीची महत्त्वाची बैठक पार पडली, या बैठकीला समितीचे सर्व सदस्य हजर होते. या बैठकीत अनेक विषयांवर चर्चा झाली. या बैठकीत नेमकं काय ठरलं? याबाबत राधाकृष्ण विखे पाटील यांनी आज माहिती दिली आहे.आज उपसमितीच्या बैठकीत आम्ही सर्वच सदस्य उपस्थित होतो. चंद्रकांत पाटील, आशिष शेलार, उदय सामंत यांच्यासह सर्वच सदस्य या बैठकीला उपस्थित होते.