आज दिनांक 13/09/2025 रोजी दुपारी 3.30 वाजता अरूणावती प्रकल्पाची पाणी पातळी 330.70 मी.असुन 97.03% जलाशय साठा झाला आहे. मंजुर जलाशय प्रचलन सुची प्रमाणे सप्टेंबर 2025 अखेर जलाशय पातळी 330.85 मी.100% जलाशय साठा पर्यंत भरावयाचा आहे. सद्या धरणाच्या पाणलोट क्षेत्रात मुसळधार पाऊस सुरू असून धरणाच्या सुरक्षेच्या दृष्टीने प्रकल्पातुन आज दुपारी 4 पर्यंत ऐकून विसर्ग 84 क्युमेक्स ( 2966.592 क्यूसेक ) वरून 139.39 क्युमेक्स ( 4937.33 क्यूसेक ) पर्यंत वाढल्याने धरणाचे 11 गेट उघडण्यात आले आहे