सात सप्टेंबरला रात्री आठ वाजताच्या सुमारास मिळालेल्या माहितीनुसार पोलीस ठाणे सक्करदरा अंतर्गत येणाऱ्या बॉलीवूड सेंटर पॉईंटच्या भिंतीलगत चाळीस वर्षीय अज्ञात व्यक्ती बेशुद्ध अवस्थेत आढळून आले. त्यांना उपचाराकरिता मेडिकल हॉस्पिटल येथे दाखल केले असता उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला या प्रकरणी प्राप्त सूचनेवरून पोलीस स्टेशन सक्करदरा येथे अकस्मात मृत्यूची नोंद.