Download Now Banner

This browser does not support the video element.

धुळे: धाडरे येथे विषारी औषध प्राशन केल्याने वृद्धाचा मृत्यू, धुळे तालुका पोलीस ठाण्यात नोंद

Dhule, Dhule | Sep 10, 2025
धुळे तालुक्यातील धाडरे गावात दारूच्या नशेत विषारी औषध प्राशन केल्याने ७५ वर्षीय बापू शेणपडू मोरे यांचा मृत्यू झाला. ४ सप्टेंबर रोजी रात्री त्यांनी औषध घेतल्याने त्यांना मळमळ, उलट्या होऊ लागल्या. कुटुंबीयांनी त्यांना जिल्हा रुग्णालयात दाखल केले होते. मात्र उपचारादरम्यान ९ सप्टेंबर रोजी सकाळी त्यांचा मृत्यू झाला. याप्रकरणी धुळे तालुका पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद झाली असून तपास सुरू आहे.
Read More News
T & CPrivacy PolicyContact Us