रत्नागिरी शहराजवळील चर्मालय येथे साळवी स्टॉप मार्गांवर डंपर आणि दुचाकीच्या अपघातात दुचाकी चालकाचा जागीच मृत्यू झाला. अपघाताची ही घटना मंगळवार 26 ऑगस्ट रोजी सायंकाळी 7 वा. सुमारास घडली. महेश घडशी (रा. तिवंडेवाडी शिरगांव, रत्नागिरी ) अस अपघातात मृत्यू झालेल्या दुचाकी चालकाचे नाव आहे. मंगळवारी सायंकाळी तो आपल्या ताब्यातील दुचाकी (एमएच-48-बीवाय-8877) वर मागे ओमकार सनगरेला बसवून चंपक मैदान ते साळवी स्टॉपला जात होता. चर्मालय येथील चार रस्त्यापुढे गेला असता मागून येणाऱ्या डंपरने ठोकर दिली