गोंदियाकडून रायपूरकडे धावणाऱ्या दुरंतो एक्सप्रेसने मजुरीसाठी जाणाऱ्या सायकलस्वाराला जबर धडक दिली. या धडकेत दिलीप मुन्नालाल लिल्हारे (३५) रा. जमीनदार वाड्यासमोर आमगाव याचा मृत्यू झाला. नेहीप्रमाने तो सायकलने कामावर गोंदियाला जाण्यासाठी तो सायकलने निघाला. याच वेळी किंडगीपार येथील रेल्वेफाटक बंद होती. या बंद फाटकातून तो सायकल काढत मार्गक्रमण करीत असतांना भरधाव वेगात असलेल्या दुरंतो एक्सप्रेसने त्याला धडक दिल्याने जागीच त्याचा मृत्यू झाला. ही घटना २९ ऑगस्ट रोजी दुपारी ४ वाजता किडंगीपार रेल