घनसावंगी तालुक्यातील कुंभार पिंपळगाव गावात डेंगुसदृश तापाने भीषण परिस्थिती निर्माण केली असून अखेर या आजाराने एका तरुणाचा बळी घेतला आहे. लक्ष्मण सोमेश्वर कंटुले (वय २२) या व्यापारी युवकाचे शुक्रवारी (ता.२२) छत्रपती संभाजीनगर येथील रुग्णालयात उपचारादरम्यान निधन झाले. गावातील शेतकरी सोमेश्वर कंटुले यांचे ते चिरंजीव होते. शुक्रवारी रात्री उशिरा त्यांच्या अंत्यसंस्काराची प्रक्रिया पार पडली.