मोहोळ येथील रेल्वे स्टेशनवर सिद्धेश्वर एक्सप्रेस या रेल्वेला थांबा मिळावा अशी मागणी अनेकांकडून करण्यात आली होती. आता या मागणीला यश मिळाले असून मोहोळ येथील रेल्वे स्टेशनवर सिद्धेश्वर एक्सप्रेस गाडी दिनांक 3 सप्टेंबर पासून थांबणार असल्याची माहिती मोहोळ नगर परिषदेचे प्रथम नगराध्यक्ष रमेश बारस्कर यांनी आज सोमवार दिनांक 1 सप्टेंबर 2025 रोजी दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास पत्रकारांशी बोलताना दिली आहे.