अहेरी तालुक्यातील मौजा ताटीगुडम ग्रामपंचायत कमलापूर येथे एका खाजगी विहीरीतून गरम पाणी येत असल्याची घटना घडली असून ही बाब चुनखडकाच्या रासायनिक अभिक्रियेमुळे होत असल्याचे जिल्हा परिषदेच्या ग्रामीण पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता विनोद उद्धरवार यांनी स्पष्ट केले आहे.