30 ऑगस्ट च्या मध्यरात्री अज्ञात चोरट्यांनी पोलीस ठाणे बुटीबोरी हद्दीतील एस के जी स्टाफ कॉलनी येथील घरांना निशाणा बनविले. येथून दोन दुचाकीसह 40 हजार रुपयांचा मुद्देमाल चोरट्यांनी चोरून नेला. वैभव भिवंडे यांच्या घरासमोर लॉक करून ठेवलेली दुचाकी तसेच त्यांचे शेजारी सूर्यकांत पांडे यांची दुचाकी चोरटे घेऊन गेले आणि कॉलनीतील इतर लोकांच्या घरी चोरी करून चांदीचे सिक्के आणि नगदी घेऊन चोर फरार झाले.