बऱ्याच वर्षांपासून प्रतीक्षेत असलेल्या सोलापूर मुंबई विमानसेवेचा मार्ग मोकळा झाला आहे. मंगळवारी झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत सोलापूर -पुणे – मुंबई विमानसेवेकरीता व्हायबिलिटी गॅप फंडिंग देण्यास मंजुरी देण्यात आली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पालकमंत्री जयकुमार गोरे आणि आमदार देवेंद्र कोठे यांनी केलेल्या पाठपुराव्याला यश आले आहे. यासंदर्भात आमदार देवेंद्र कोठेनी मंगळवारी दुपारी 4 वाजता पत्रकारांशी बोलताना अधिक माहिती दिली.