मासेमारी साधने खरेदीवर अर्थसहाय्य या योजनेचा लाभ जिल्ह्यातील मत्स्यव्यवसाय सहकारी संस्थांना मिळणार असून, या योजनेत सर्वसाधारण, अनुसुचित जाती तसेच आदिवासी उपक्षेत्राबाहेरील मत्स्यव्यवसाय सहकारी संस्थांमधील सभासदांना प्रती सभासद 20 किलो या प्रमाणे अनुदान विभागामार्फत वितरित केले जाणार असल्याची माहिती दि. 03 सप्टेंबर रोजी दुपारी सहाय्यक आयुक्त मत्स्यव्यवसाय (तांत्रिक), वाशिम यांनी दिली आहे.